क्राईमताज्या बातम्या
न्याय देवता जो न्याय देईल तो भोगायला मी तयार – वाल्मिक कराड

बीड – बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात शरणागती स्वीकारण्यूपूर्वी वाल्मीक कराडने आपल्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई होत असल्याचा दावा केला आहे. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे त्याने म्हटले आहे.
वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. तो एका कारमधून सीआयडी कार्यालयात पोहोचला. त्यावेळी त्याच्या आत्मसर्पणाची कुणकुण लागलेल्या पत्रकारांनी तिथे अगोदरच गर्दी केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. अखेर वाल्मी कराड कारमधून उतरताच माध्यमांनी त्याला गराडा घातला. तसेच या प्रकरणी त्याच्या प्रतिक्रियेची मागणी केली. पण वाल्मीक कराड हात जोडत पोलिसांच्या मदतीने तेथून निघून गेला.



