सैफ अलीवर उपचार करणारे डॉ. नितिन डांगे काय म्हणाले


उपचारासाठी 36 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती
16 जानेवारी रोजी कॅशलेस उपचारासाठी विमा कंपनीशी खान कुटुंबियांचं बोलणं झालं होतं. अभिनेत्याला शस्त्रक्रियेसाठी एका रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. 21 जानेवारी पर्यंत सैफवर उपचार होणार आहे. 5 दिवस अभिनेता रुग्णालयात राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या उपचारासाठी 36 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे.
काय म्हणाले डॉ. नितिन डांगे?
लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे शुक्रवारी म्हणाले, ‘सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…’ अभिनेत्याला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.
अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.




