माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा विमानाने बँकॉकला जाण्याचा प्रयत्न; पोलिसांनी विमान आणले परत

पुणे / प्रतिनिधी
शिवसेना नेते तानाजी सावंत म्हणाले की, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाने चार्टर विमानाने बँकॉकला जाण्याचा प्रयत्न; पोलिसांनी विमान परत आणले.
ऋषिराज सावंत यांच्या अचानक गायब होण्यामुळे तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांना अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि ऋषिराज सावंत हे चार्टर विमानाने बँकॉकला जात असल्याचे उघडकीस आले.
तानाजी सावंत यांनी पोलिसांना मध्यस्थी करून ऋषिराज सावंत यांचे विमान परत आणण्याचा प्रयत्न केला. पण, ऋषिराज सावंत यांनी बापाच्या माघारी चार्टर विमानाने बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे त्यांना थांबवणे शक्य झाले नाही.ऋषिराज सावंत यांना पुणे विमानतळावर परत आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी घरी न सांगता बँकॉकला जाण्याचे कारण काय होते, आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करावी का, याबद्दल विचारले जात आहे.



