प्रसिद्ध अभिनेत्री बनली महामंडलेश्वर, मात्र किन्नर आखाड्यात माझ्याबद्दल वाद सुरू

मुंबई / प्रतिनिधी
ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यात माझ्याबद्दल वाद सुरू आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी २५ वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वी राहीन. मेकअप व बॉलिवूडपासून इतके दूर कोण राहते? तरीही लोक माझ्यावर प्रतिक्रिया देतात. सर्व प्रकारचे अलंकार परिधान करणारा तो एक महान योगी आहे,
महामंडलेश्वर बनलेल्या ममतांवर १० कोटी रुपये देवून ही पदवी घेतल्याचा आरोप होत होता. संगमात स्नान केल्यानंतर त्यांचे पिंडदान करण्यात आले. यानंतर, आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांचा पट्टाभिषेक केला. त्यांचे नवीन नाव श्रीयमाई ममता नंद गिरी असे ठेवण्यात आले. त्या सुमारे सात दिवस महाकुंभात राहिल्या. मला महामंडलेश्वरांचा मान देण्यात आला. पण काही लोकांसाठी हे आक्षेपार्ह ठरले. मग ते शंकराचार्य असोत किंवा इतर कोणीही. मी बॉलिवूड सोडले होते.



