साजिद नाडियाडवाला @59:स्पॉटबॉयपासून कारकिर्दीची सुरुवात, आज एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क….

मुंबई / प्रतिनिधी
प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियादवाला हे चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. साजिद आज ५९ वर्षांचे झाले आहेत. वयाच्या २१व्या वर्षी स्पॉटबॉय म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. साजिद नाडियावाला हे आता बॉलिवूडमधील टॉप निर्मात्यांमध्ये गणले जातात. ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ४० हून अधिक चित्रपट बनवले आहेत, त्यापैकी बरेच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. स्पॉटबॉयपासून कारकिर्दीची सुरुवात, आज एकूण संपत्ती १२,८०० कोटी, एका सीनसाठी क्रिकेट टीमला मैदानात उतरवले होते.
साजिदचे आजोबा, वडील आणि काका हे सर्व चित्रपट निर्माते होते. चित्रपट पार्श्वभूमीतून आले असले तरी त्याची स्वप्ने वेगळी होती. त्यांना आयएएस व्हायचे होते, पण नशिबाने त्यांना इंडस्ट्रीत आणले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी उघडली. साजिद हे इंडस्ट्रीमध्ये एक निर्माता म्हणून ओळखले जातात, जे त्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रयोग करतात आणि नवीन गोष्टी करण्यास घाबरत नाहीत.



