बीआरएसपीची कार्यकारिणी जाहीर, मध्य शहराध्यक्षपदी सतीश जैस्वाल यांची निवड

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
बहुजन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) च्या मध्य शहराध्यक्षपदी सतीश जैस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले.
बीआरएसपीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांनी सतीश जैस्वाल यांची नियुक्ती केली आहे.बहुजन नायक कांशीराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून हडको एम-२ रोडवरील जैस्वाल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. प्रारंभी कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अरविंद कांबळे म्हणाले बहुजनांच्या मतावर कांशीराम यांनी उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळविले. बहुजन समाजाचा पंतप्रधान देशात व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बीआरएसपीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र देण्यात आले.
यामध्ये सतीश जैस्वाल मध्य शहर अध्यक्ष, अनामी मोरे युवा जिल्हाध्यक्ष, राजूभाऊ निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष, महेंद्र मिसाळ युवा पश्चिम शहराध्यक्ष, राहुल जाधव शहर उपाध्यक्ष पश्चिम, युनुस सय्यद गेवराई शहराध्यक्ष यांचा समावेश आहे. या वेळी निर्मला पेटारे जिल्हा उपाध्यक्ष, लता सरदार, राजूभाऊ गवारगुर पश्चिम विधानसभा अध्यक्ष, शुभम नवगिरे, त्रिशरण गायकवाड, विनोद कीर्तिकर, अजय सोनवणे इत्यादी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



