ताज्या बातम्यामराठवाडामहाराष्ट्र
आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते शरद चव्हाण यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर

जिंतूर / प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता शरद चव्हाण यांना समाज रत्न पुरस्कार’ जाहीर झाल्यामुळे तालुक्यात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.शहरात महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले होते. ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. याच कामाची दखल घेऊन ३० मार्च रोजी पारेगाव (जि. जालना) येथे त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



