दिशा सालियान मुद्द्यावरून या महिला नेत्यांमध्ये जुंपली, एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप

मुबई / प्रतिनिधी
भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ यांच्यावर सध्या चौफेर हल्ले सुरु आहेत. दिशा सालियान मुद्द्यावरून विधिमंडळात त्यांच्यामध्ये आणि अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक द्वंद रंगलं होते. त्यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना मी तुमच्या सारखे ५६ पायाला बांधून फिरते, असे म्हंटलंे होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चित्रा वाघ यांना टार्गेट केले जात आहे. शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर ‘बिग बॉस’ रिएलिटी शो चा संदर्भ देऊन टीका केली. “एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका लोकप्रतिनिधी बाबत असं वक्तव्य करते. त्या सभागृहाची एक गरिमा आहे. त्या गरिमेच्या हिशोबाने तिथे वक्तव्य करणं अपेक्षित आहे” असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
टीआरपी वाढला की बिगबॉस खुश होतो. इथे असच आहे का? कुठल्यातरी बिग बॉसला खुश करण्यासाठी उणी-दुणी काढायची. एकमेकाच्या अंगावर धावून जायच म्हणजे बिग बॉस खुश होणार. कालचा प्रकार असाच वाटला, यातून निष्पन्न काही झाले नाही. शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. महिला अत्याचाराबद्दल काही बोलल गेले नाही. फक्त उणीदुणी काढण्याचा प्रकार होता अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.



