प्रशांत कोरटकर याचा निषेध करण्यासाठी ९ नंबरच पायताण घेऊन आलोय…

कोल्हापूर / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आलं. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिस स्टेशनबाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे.
प्रशांत कोरटकर याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी दाखल झाले असून ते संतप्त आहेत. एक शिवप्रेमी तर हातात कोल्हापूरी चप्पल घेऊनच पोलीस स्टेशनबाहेर उभा आहे.९ नंबरचे पायताण मी घेऊन आलोय, ते बरोब्बर त्याच्या गालावर उठावयचं आहे अशी भावना एका इसमाने व्यक्त केली आहे. आम्ही सगळे शिवभक्त इतके संतापलो आहोत. ज्या पद्धतीने त्याने छत्रपतींचा अवमान केला आहे आणि ज्या पद्धतीने तो राजरोसपणे फिरतोय, जणू त्याला काही फरकच पडत नाही असा त्याचा आव आहे. म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी ही कोल्हापुरी चप्पल आणलीये अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.



