त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

बीड / प्रतिनिधी
अजित पवारांनी चुकीची काम करणाऱ्यांनाही खडसावलं. काही ठिकाणी बेक्कार कामे चालू आहेत. माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. मी स्क्वॉड पाठवून चेक करणार आहे. अजितदादाच्या जवळचा कंत्राटदार असेल तरी कारवाई करणार. काळ्या यादीत टाकणार,असा इशारा दादांनी दिला.
बीड जिल्ह्यातील लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. मी पुढच्यावेळी मुक्कासाठी येईन,बीडमधील प्रतिष्ठीत लोकांची बैठक घेणार आहे. त्यांच्या आमच्याकडच्या अपेक्षा काय आहे हे विचारणार आहे. काही काही भाग खूप पुढे गेले आहे पण आपल्याकडचा कचराही निघत नाही. कचराही साफ होत नाही, इतका विरोधाभास आहे. आपल्याला लोकांच्या मानसिकतेत बदल करायचा आहे असं अजित पवार म्हणाले. प्रतिष्ठीत लोकांचाही काही विचार असेल. त्यांना विश्वासात घेणार, त्यांचं काय व्हिजन आहे हे पाहणार. मी सर्व अधिकारी हजर ठेवेन,. मी जिथे जातो तिथे सर्व अधिकारी हजर ठेवतो. कारण तिथल्या तिथे निर्णय घ्यायला सोपं जातं, असं अजित दादांनी सांगितले.



