मुलीने मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याने रागाच्या भरात पोलिस बापाने केला मुली अन् जावयावर गोळीबार

मुलीने आपल्या मनविरुद्ध प्रेम विवाह केल्याचा राग बापाच्या मनात होता. त्यामुळे दोन वर्षानंतर जावयाच्या बहिणीच्या लग्न समारंभात बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे तर जावई गंभीर जखमी आहे. त्याला पुण्याला हलवण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या सासऱ्याला जमावाने बेदम चोप दिला. त्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणात गोळीबार करणारे किरण अर्जुन मंगले यांच्यासोबत कोण आहे का? त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मुलीचे वडील किरण मंगले यांना तृप्ती आणि अविनाश चोपड्यात लग्नाला आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते शिरपूरवरुन चोपड्यात आले. त्यांनी लग्न समारंभातच मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्याकडे परवाना असलेल्या पिस्तूलमधून हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार केला त्या ठिकाणी किरण मंगले यांच्या सोबत कोणी नव्हते. परंतु इतर ठिकाणावरुन त्यांना कोणी मदत केली का? त्याचा तपास सुरु आहे. किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफमध्ये होते. ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे परवाना प्राप्त पिस्तूल होते. त्यातूनच हा गोळीबार केला. किरण मंगले यांनी तीन राउंड फायर केले होते, असे डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.



