राज्यभरातील 9 हजार 658 जागा, इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरी एवढी मोठी भरती

मुंबई / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील करीच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. अनुकंपा तत्त्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणीतीलही जागा भरल्या जाणार आहे. ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 जागा आहेत. या सर्व जागा 15 सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार आहेत. ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरी एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळते आहे. चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदराकडून केली जाते. मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10 हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अनुकंपा तत्वावरील सर्व रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच या नियुक्ती प्रक्रियेत अनेक सुधारणा करून मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रक्रिया येत्या १५ सप्टेंबर 2025 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे.




