महाविकास आघाडीच्या आमदारांना खा. श्रीकांत शिंदेंचे जेवनाचे निमंत्रण

मुंंबई – प्रतिनिधी
महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर विजय मिळवता आला. यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ७८ आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे १०, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ आणि काँग्रेसच्या ६ आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ७८ नवोदित आमदारांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
मागील पाच वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप घडले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटले. आधी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने सरकार बनवले. नंतर अजित पवार हे देखील सरकारमध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने यांच्या महाविकास आघाडीत लढत झाली. या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.



