छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामराठवाडासामाजिक
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव साळवे यांच्या उपस्थितीत रुपाली सुतार, नीता शेळके यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत रूपाली दिलीप सुतार जिल्हाप्रमुखपदी तर नीता पवन शेळके शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पश्चिम शहराध्यक्षपदी नीता शेळके, कार्याध्यक्षपदी सुशीला लहाने, पश्चिमच्या सचिवपदी वैशाली जाधव यांची निवड नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. यावेळी लता कोरके, सुनीता शहाणे, अश्विनी जगदने, रामा पटेकर अंजली सेकंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव साळवे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



