ठाकरेंची सेना संपुष्टात येणार? बुडत्या जहाजात कोण बसणार

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
आगामी पालिका निवडणुकीचा अंदाज त्यांनी अगोदरच मांडला. सर्व गोळाबेरीज करता, ठाकरेंची सेना संपुष्टात येण्याचा दावा केला. बुडत्या जहाजात कोण बसतो, असा सवाल करत त्यांनी सध्याच्या उद्धव सेनेच्या गळतीवर कटाक्ष टाकला. पण भाजपाच्या संघटन पर्व कार्यशाळेत दानवे यांनी केलेल्या वक्तव्याने वाद ओढवला.
आपण अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात नाही. मात्र त्यांची जी वागण्याची पद्धत आहे. त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लोक नाराज आहेत, असे दानवे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सत्तारांवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला. एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनाच लाभ दिल्या जात आहेत. इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा आहे. मी देखील त्यांचा विरोध करतो. सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले.



