याच लाडक्या बहिणींना मिळणार १५०० रुपयांचा लाभ, बघा काय आहेत अटी…

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
योजनेतील अटी नियम
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.



