छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यापरभणीमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

वाढदिवशीच भाजपच्या माजी मंत्र्यांची निवृत्तीची घोषणा

बबनराव लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांनी आपल्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ‘माझं वय आता 60 वर्षे झालेलं आहे, त्यामुळे मी आता रिटायरमेंटच्या दिशेनं आहे. वाढदिवशीच भाजपच्या बड्या नेत्याकडून आपल्या निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. माजी मंत्री आणि भाजपचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी यापूढे आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे.
मात्र दुसरीकडे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे. असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. आज बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस असून यावेळी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बबनराव लोणीकर यांनी ही घोषणा केली आहे. लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणत, एकप्रकारे त्यांनी आपल्या निवृत्तीचेच संकेत दिले आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लोणीकर यांना लोकसभेची संधी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!