क्राईमछत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामुंबई

३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न, आरडाओरड केल्याने चाकूने वार, पडले २८० टाके

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी

बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर ३६ वर्षीय विवाहितेने आरडाओरडा सुरू केल्याने विकृताने तिच्यावरती वार केले आहेत. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (१९, रा. घारदोन) असे विकृताचे नाव आहे, चिकलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली आहे. 

पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, तिला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा येतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझे अंग शिवावं लागले. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच २२ हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असे ती पिडित महिला म्हणते.

भावकीतीलच ३६ वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी १९ वर्षांच्या तरुणाने केली. तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल २८० टाके घालावे लागलेत. तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे.  भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना ११ वर्षांची दोन मुले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!