आंतरराष्ट्रीयछत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबई

माझ्यासारख्या गरीब मुलाला घर दिले; अजितदादांच्या निधनानंतर सूरज चव्हाणला अश्रू अनावर

बारामती / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामती विमानाने प्रवास करत होते. विमान लँडिंग आधी बरामती विमानतळाजवळील एक शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचा ब्लास्ट झाला. या विमान अपघतात महाराष्ट्राने रुबाबदार नेता गमावला. अजित पवार यांचे भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाणने पोस्ट केली आहे. सूरज हा भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रज चव्हाणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो अजितदादांना नमस्कार करताना दिसत आहे. पुढे त्याने अजित दादांचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सूरजने, मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत… माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं… माझी काळजी घेतली.. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पानंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!