तुरूंगातून बाॅयफ्रेंडकडून जॅकलिनसाठी प्रेमपत्र, विशेष हेलिकॉप्टर भेट

मंडोली कारागृहातून लिहिलेल्या हस्तलिखित पत्रात सुकैशने जॅकलिनसाठी खास भेट ठेवल्याचे सांगितले. “डार्लिंग, तुझ्यासारख्या क्वीनसाठी एक खास गिफ्ट अरेंज केले आहे,” असे त्याने पत्रात म्हटले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पत्रात त्याने तिच्यावरील प्रेम व्यक्त करत भावनिक शब्दांत आठवण काढली. त्याने लिहिलं,“या तुरुंगाच्या कठोर भिंतींमुळे मी तुझ्यापासून दूर आहे. वाळवंटात भरकटलेल्या माणसासारखी मला तुझी प्रचंड आठवण येते… बेबी बोम्मा, तुला जवळ घेऊन तुझ्या कानात प्रेमाने काही शब्द कुजबुजावेत असं मला वाटतं,” अशा भावनिक शब्दांत सुकैशने भावना व्यक्त केल्या. तसेच, आपल्या कृतींमुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीत जॅकलिनला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले, याबद्दल त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

सुकैशच्या दाव्यानुसार, त्याने जॅकलिनसाठी कस्टमाइज्ड Airbus H-Series हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. या हेलिकॉप्टरच्या इंटेरियरमध्ये ‘JF’ अशी अभिनेत्रीची आद्याक्षरे असतील, असेही त्याने म्हटले. यापूर्वीही त्याने तिला यॉट आणि जेट भेट दिल्याचा दावा केला होता.

