“मुंब्र्यात नवा वाद! सहर शेख यांच्यानंतर आता इम्तियाज जलील यांचीही ‘गर्जना; आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात ठिणगी”

मुंबई / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीमध्ये सहर शेख यांना एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्या एमआयएमच्या तिकीटावर विजयी देखील झाल्या, दरम्यान विजयी झाल्यानंतर त्यांनी कैसे हराया? म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं होतं, मुब्राला हिरवा करायचं आहे, अशा अशयाचंं ते विधान होतं. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. या वक्तव्या प्रकरणात पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज सहर शेख यांच्यासह मुब्र्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असं जलील यांनी म्हटलं आहे.
महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निकाल जाहीर झाले. या निकालानंतर ठाण्याला लागून असलेल्या मुंब्रा भागातील एक नगरसेविका व्हायरल झाली. तिचं नाव सहर शेख. MIM पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली व सहर शेख निवडून आल्या. निकालानंतर सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं म्हटलं. भाषणा करतानाची त्यांची ‘कैसा हराया’ स्टाइल त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार या सहर शेख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट दिली.


